maval. chhatrapati shivaji maharaj, lohgad fort, maval news saam tv
मुंबई/पुणे

Lohgad Fort : लाेणावळा पाेलिस सतर्क, लाेहगडावर जमावबंदी आदेश लागू

लाेणावळा पाेलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.

दिलीप कांबळे

Urs on lohgad fort : लोहगड किल्ला येथे उद्या (शुक्रवार) हाेणा-या उरूस साजरा हाेऊ देणार नाही असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. यामुळे उरुसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच विराेध हाेत असल्याने शेकडाे नागरिक लाेहगडावर जाण्याची शक्यता असल्याने लोणावळा पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. (Maharashtra News)

मावळातील लोहगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेला हा लोहगड किल्ला. या गडावर सहा मजारी तयार करण्यात आल्या आहेत. याचा इतिहासाची काहीही संबंध नाही. आणि या मजारी अधिकृत करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून उरूस साजरा केला जातो असा आराेप विश्व हिंदू परिषदने केला आहे.

या उरुसामुळे पशुपक्ष्यांना हानी निर्माण होते इथल्या पाण्याच्या टाक्या अशुद्ध होते. त्यामुळे या उरुसाला आमचा विरोध आहे असे बाळासाहेब सांडभोर यांनी नमूद केले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अनेक वेळा उरूस बंद करा यासाठी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

दरम्यान लोहगड किल्ल्यावरील हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याच्या उरुसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हाेणारी गर्दी लक्षात घेता तसेच उरुसाला हाेणार विराेध लक्षात घेता लोणावळा पोलिसांकडून (police) सर्वप्रकारे खबरदारी घेतली जात आहे.

त्यासाठी लोहगडाच्या परिसरात आजपासून (गुरुवार) जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT