Virar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Virar Crime News: आधी दारू पाजली अन् मग ७५ वर्षीय वृद्धासोबत केलं भयंकर कृत्य; धक्कादायक घटनेनं विरार हादरलं

Virar Crime News Today: विरार उसगावमध्ये अवघ्या दोन हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेनं विरार हादरलं.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Crime News Today: विरार उसगावमध्ये अवघ्या दोन हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

मांडवी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत 25 मे रोजी एका वृद्धाची दोन हजार रुपयांसाठी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. विरार मांडवी पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आले असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ दोन हजारांसाठी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. याबाबत तपास करणाऱ्या पोलिसांनी वेगवेगळी तीन पथके तयार करून शोध घेतला असता सिसिटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे शिरसाड येथे आरोपीला सापळा रचून पकडण्यात आले.

सदर आरोपी हा उसगाव येथेच राहणारा असून विनोद असे या आरोपीचे नाव आहे. विनोद याने आपली बायको घरी यावी यासाठी पूजा करण्यासाठी २ हजार रुपये दिले होते. मात्र पत्नी पुन्हा परत येण्याची विधी न केल्याचा मनात राग धरलेल्या विनोदने त्या वृद्ध व्यक्तीला बोलावून दारू पाजली. (Breaking Marathi News)

त्यानंतर त्याला निर्जन ठिकाणी घेऊन जात त्याची हत्या केली. हत्यारा विनोद हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी खुनाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. मात्र कोरोनाकाळात त्याला सोडण्यात आले होते.

सदर आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचे समाजात खुले पणाने वावरणे सामाजिक हितासाठी धोक्याचे आहे. यासाठी त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी सांगितले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT