Pune News saam tv
मुंबई/पुणे

Viral Video: ठाकरे गटाचे शहर प्रमुख-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी! व्हिडिओ व्हायरल

Pune News: विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान चिंचवडमध्ये हा प्रकार घडला.

गोपाल मोटघरे

Pune News: ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान चिंचवडमध्ये हा प्रकार घडला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे यावेळी मोठा अनर्थ टळाला. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल होत आहे.

पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले असून जखमी झालेले ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात दोन्ही गट परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. थेरगांव श्रीकृष्ण कालोनी येथे ही घटना घडली. (Latest Marathi News)

या मारहाणीत सचिन भोसले हे गंभीर जखमी झाले झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केल्याचा आरोप सचिन भोसले यांनी केला आहे. (Pune News)

सचिन भोसले हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा प्रचार करत होते. या प्रचारादरम्यानच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप सचिन भोसले यांनी केला आहे. त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ते पोलिसांत नेमकी काय तक्रार देतात आणि कोणाविरोधात तक्रार देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT