Mumbai News 
मुंबई/पुणे

खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकीन; मुंबई पोलिसाच्या धमकीने खळबळ, DCP ने थेट दिले कारवाईचे आदेश

Mumbai Police viral video investigation : विद्यार्थ्याला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची कथित धमकी देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले.

Namdeo Kumbhar

"तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन, खिशात ५०-५० ग्रॅम ड्रग्जची पावडर टाकून खोट्या केसमध्ये अडकवेन," अशी उघड धमकी एका विद्यार्थ्याला देणाऱ्या मुंबई पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी या पोलिसाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. नीट पेपरफुटीआणि निदर्शनांदरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या व्हिडिओचा उल्लेख करत पोलिसांकडे ड्रग्ज मिळतात का, असा थेट सवाल करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलाय. आंदोलनात पुन्हा दिसल्यास ५० ग्रॅम पावडर टाकून आयुष्य उद्धवस्त करण्याची धमकी पोलीस अधिकारी देत आहे. या व्हिडिओची पुष्टी झालेली नसून पोलिसांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

व्हिडिओत नेमकं काय आहे?

व्हिडिओमध्ये एका पोलिसाचा क्लिप दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये तो तरुण मुलांना धमकी देताना दिसत आहे की, "या परिसरात पुन्हा दिसलात तर खिशा ५०-५० ग्रॅम पावडर टाकीन" हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भविष्यातील आंदोलनांमध्ये सहभागी न होण्याचा इशाराही पोलिसांनी दिला. तो अधिकारी असेही म्हणताना ऐकू येतो की, "माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. तुम्ही लोक आमच्यासाठी त्रास निर्माण करत आहात." पोलिसांकडून तरुणांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राज ठाकरेंचा थेट सवाल?

या व्हिडिओचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, "पोलीस त्या मुलांना धमकी देतात की खिशात ५० ग्रॅम पावडर टाकेन. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर (ड्रग्ज) पण मिळायला लागली आहे का? पोलीस ड्रग्जचे एजंट किंवा ड्रग्ज सप्लायर आहेत का?" असा सवाल राज ठाकरेंनी केला.

मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि त्यासंबंधित परिस्थितीची पडताळणी करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असून, तथ्यांची पडताळणी केल्यानंतर कारवाई केली जाईल," असे पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये दिसलेल्या अधिकाऱ्याची ओळख किंवा आरोपानुसार वक्तव्ये केली गेली होती की नाही? याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केलेली नाही. पुढील कारवाई चौकशीच्या निष्कर्षांवर अवलंबून असेल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार क्युसेस पाण्याचा विर्सग सुरू

Assam Flood: आसाममध्ये पावसाचा हाहाकार, पूर- भूस्खलनाने घेतला ४१ जणांचा बळी

Mumbai Rain : भातसा धरण ६५ टक्के भरले, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या कोणत्या धरणात किती साठा?

Rajkummar Rao: 'मोदी है तो मुमकिन है' गाण्यावरून राजकुमार राव ट्रोल; 'तो दबाव तुम्हाला समजणार नाही' म्हणत दिले उत्तर

१८ व्या शतकातील मंदिरात धाडसी चोरी; २८ लाखांची चांदीची पिंड लंपास, पुणे अन् अहिल्यानगरच्या ४ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT