Navi Mumbai Police Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video : बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Navi Mumbai Police Viral Video : नवी मुंबईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा लेडीज बारमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे पोलीस शिस्त आणि नैतिकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Alisha Khedekar

  • नवी मुंबईतील लेडीज बारमधील पोलीस हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

  • अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस असल्याचे उघड

  • व्हायरल व्हिडिओनंतर तात्काळ निलंबनाची कारवाई

  • पोलीस शिस्त, नैतिकता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

नवी मुंबईतून पोलीस दलाला हादरवणारं कृत्य समोर आलं आहे. एका पोलीस हवालदाराचा लेडीज बारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओनंतर पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा पोलीस हवालदार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात काम करीत होता. अनैतिक गोष्टींवर निर्बंध आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाने अशा प्रकारचं कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनिल सुखदेव मांडोळे यांचा कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते मद्यप्राशन करत नृत्य करणाऱ्या महिलांवर पैसे उडवत असताना चित्रित करण्यात आलं आहे. या प्रकारानंतर मांडोळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

पोलीस उप आयुक्त सचिन बाबासाहेब गुंजाळ यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी निलंबनाचा आदेश जारी केला असून, अनैतिक प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी असताना अशा ठिकाणी उपस्थित राहणे हे खाकी वर्दीला न शोभणारे असल्याचा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे. या गंभीर घटनेनंतर पोलीस प्रशासनात हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस शिस्त, नैतिकता आणि विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT