Mumbai Local Train Women Fight Viral Video From Thane-Badlapur Local Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; केस ओढले, चापटा मारल्या अन्... ; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाणे-बदलापूर लोकलमध्ये नेमका वाद कशावरून झाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Alisha Khedekar

  • ठाणे-बदलापूर लोकलमध्ये महिलांमध्ये वादानंतर हाणामारी

  • व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • डब्यातील इतर प्रवाशांनी महिलांचा वाद थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर

  • पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही

मुंबईची लोकल ट्रेन म्हणजे दररोज लाखो प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेली जीवनवाहिनी. मात्र, याच लोकलमध्ये प्रवाशांमध्ये होणारे वाद अनेकदा टोकाला जाताना दिसतात. सध्या मुंबई लोकलमधील महिलांच्या हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला प्रवाशांमध्ये झालेला वाद थेट मारामारीपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये लोकलच्या डब्यात काही महिला एकमेकींशी जोरदार वाद घालताना दिसत आहेत. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची सुरू असल्याचे दिसते. मात्र, काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. महिलांनी एकमेकींना मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून, आजूबाजूला असलेल्या प्रवाशांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येते.

लोकल ट्रेनमध्ये जागा, गर्दी, चढताना किंवा उतरताना झालेली धक्काबुक्की अशा कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद होण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र, किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या डब्यात इतर महिला प्रवासी आणि लहान मुलांसमोरच हा प्रकार घडल्याचे व्हिडीओवरून दिसते.

हा व्हिडीओ ठाणे बदलापूर लोकलमधला असून हा वाद कशामुळे सुरू झाला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच, या घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासन किंवा पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी वाद वाढवण्याऐवजी संयमाने परिस्थिती हाताळणे गरजेचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि गर्दीच्या वेळी संयम राखण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये मिरवणूकीच्या कार्यक्रमात मंदिरासमो हवेत गोळीबार

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT