Viral Video Leopard Enters Bungalow in Manchar SAAM TV
मुंबई/पुणे

VIDEO : ६ फूट उंच संरक्षण भिंतीवरून बिबट्याची थेट बंगल्यात एन्ट्री; कधी विचार पण केला नसेल असे घडले...

Leopard Video : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथेही मानवी वस्तीत बिबट्या घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

डी. के. वळसे-पाटील

Manchar News : बिबट्याला समोर बघून दरदरून घाम फुटतो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्या घुसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथेही मानवी वस्तीत बिबट्या घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तब्बल सहा फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून बिबट्या बंगल्यात शिरला. तेथील कुत्र्याला उचलून नेले. ही घटना नुकतीच मंचर (ता.आंबेगाव) येथे घडली. त्यामुळे मंचर शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

कुठे घडली घटना?

मंचर शहराच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर एस कॉर्नर येथे भरवस्तीत शेतकरी श्रीराम वामनराव गांजाळे यांच्या बंगल्याला तटबंदी संरक्षक भिंत असून लोखंडी प्रवेशद्वार आहे. बिबट्याचा या भागात वावर होता, पण संरक्षण भिंती असल्यामुळे बिबट्या येणार नाही असा समज गांजाळे कुटुंबाचा होता.

श्रीराम गांजाळे यांचा काळू नावाचा लाडका कुत्रा दिसत नव्हता. कदाचित कुत्रा बाहेर गेला असेल तो परत माघारी येईल म्हणून कुटुंबीय वाट पाहत होते. पाच ते सहा दिवस होऊनही काळू घरी आला नाही. त्यामुळे नुकतेच गांजाळे कुटुंबीयांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. चक्क बिबट्या कुत्र्याला घेऊन जाता असताना दिसला.

यापूर्वीही शरद सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात यांच्या चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील बंगल्याच्या सहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून कुत्र्याचा फडशा पडल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

व्हायरल व्हिडिओ बघा!

'बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावा'

मंचर येथील बांधकाम व्यावसायिक प्रशांत बागल यांनी सांगितले की, ''गेल्या तीन महिन्यांत बिबट्याने अनेक कुत्र्यांचा फडशा पडला आहे. ६ ते ७ शेळ्या मेंढ्या व वासरे फस्त केली आहेत. काही दुचाकीस्वारांवरही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात बंजारा समाजाचे आरक्षण मागणीसाठी आंदोलन

GK: जगातील सर्वाधिक तलाव असलेला देश कोणता? जाणून घ्या सविस्तर रंजक माहिती

Samruddhi Kelkar: जरतारी काठ, नऊवारी थाट, मोगर गजरा साजे केसात...

Rahul Gandhi PC Highlights: मतचोरीचे अ‍ॅडिशन- डिलीशन पुराव्यासह दाखवले, राहुल गांधींचे 10 गंभीर आरोप

Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

SCROLL FOR NEXT