Vikhroli Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Vikhroli Crime News: विक्रोळी विनयभंग प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या, अटकेतील आरोपी कोण?

Vikhroli News: विक्रोळी विनयभंग प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या, अटकेतील आरोपी कोण?

Satish Kengar

>> सचिन गाड

Vikhroli Crime News:

विक्रोळीत महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ईदच्या मिरवणुकीत महिलेची छेड काढल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपींवर कारवाई करण्यासाठी स्थानिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. अखेर या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पार्क साईट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ईदच्या मिरवणुकीत महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती, असं सांगण्यात येत आहे. यानंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी स्थानिकांनी केली. (Latest Marathi News)

स्थानिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. या घटनेचा एका व्हिडिओही समोर आला होता. महिलेने विनयभंगाची तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस कामाला लागले.

पोलिसांची सहा टीम आरोपींचा शोध घेत होती, अशी माहिती पार्क साईट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी दिली. या शोध कार्यात ज्या महिला पोलिसाची छेड काढण्यात आली होती, त्या देखील सहभागी होत्या. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT