Vikhroli Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Crime News: नात्याला काळिमा, चुलत भावाकडून बहिणीवर अत्याचार, विक्रोळी हादरली

Vikhroli Crime News: २ भावांनी आपल्या चुलत बहिणीवर लैगिंक अत्याचार केलाय. यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली असून, पीडित मुलीच्या आईला ही बाब लक्षात येताच त्यांनी नराधम भावांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

Bhagyashree Kamble

भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना विक्रोळीत घडलीय. २ भावांनी आपल्या चुलत बहिणीवर लैगिंक अत्याचार केलाय. यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली असून, पीडित मुलीच्या आईला ही बाब लक्षात येताच त्यांनी नराधम भावांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी कारवाई करत दोन्ही नराधम भावांना अटक करत, विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय.

पीडित मुलगी विक्रोळीतील एका सोसायटीत आपल्या आई वडीलांसोबत राहायची. मुलीचे आई आणि वडील दोघेही नोकरी करतात. त्यामुळे चुलत बहिणीला कंपनी मिळावी म्हणून, दोघेही वारंवार घरी येत असायचे. मुलीच्या आई वडिलांचा असा समज होता की, भावा बहिणीचे चांगले संबंध आहेत. पण चुलत भावांच्या मनात नेमकं काय चालू आहे? हे कुणालाही ठाऊक नव्हते.

३१ डिसेंबरला आईच्या लक्षात आले की, मुलीचे पोट थोडे वाढले आहे. आईनं पीडित मुलीला याबाबत विचारणा केली असता, मुलीनं याबाबत उघडपणे काहीच सांगितलं नाही. नंतर आई मुलीला तातडीने रूग्णालयात घेऊन गेली. तेव्हा पीडित मुलगी २३ आठवड्यांची गरोदर असल्याचं समोर आलं. यानंतर आईची पायाखालची वाळू सरकली. आईनं थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी मुलगी आणि पालकांचा जबाब नोंदवत आरोपी भावाविरोधात एफआयआर दाखल केलीय. मुलीनं जबाबात, १८ वर्षीय नराधम चुलत भावानं मे महिन्यात पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केलाय. नंतर २२ वर्षीय चुलक भावानं २२ ऑगस्टला तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली. दोघेही लैगिंक अत्याचार करण्यापूर्वी तिला अश्लील व्हिडिओ दाखवायचे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोन आरोपी भावांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

SCROLL FOR NEXT