vikas mhatre  saam tv
मुंबई/पुणे

KDMC ला विकास म्हात्रेंनी दिली आठवड्याची मुदत, अन्यथा आंदाेलन अटळ

महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या सात वर्षांपासून नागरिक हा त्रास सहन करताहेत.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : आठवडाभरात पाणी समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार अशा इशारा भाजपाचे माजी स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनास आज (मंगळवार) दिला. यावेळी म्हात्रेंनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आराेप केला. (Maharashtra News)

डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर,कुंभारखानपाडा परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे नळाला पाणी नसताना महापालिकेकडून टँकर देखील पुरवले जात नसल्याने नागरिकांच्या पाण्याविना हाल होताहेत. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या सात वर्षांपासून नागरिक हा त्रास सहन करताहेत.

माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. आज म्हात्रे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत पाणी समस्या आठ दिवसात सोडवण्याची मागणी केली. तसेच जर पाणी समस्या आठ दिवसात सुटली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT