Ajit Pawar Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Vidhan Sabha Election : मोठी बातमी! अजित पवार गट जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार; 10 ते 15 उमेदवारांची नावं निश्चित

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेनंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय. जम्मू काश्मीरमधील जवळपास 25 जागांवर अजित पवार गटाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. यातील 10 ते 15 उमेदवारांची नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.

नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेत हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गट (Ajit Pawar) जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

पुढील म्हणजेच सप्टेंबर महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक (Jammu and Kashmir Assembly Election) झाली नाही. कलम 370 हटविल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.

त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 83 जागा होत्या. पण यंदा 7 जागा वाढल्या असून 90 जागांसाठी निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीसाठी अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे.

नुकतेच अजित पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा दौरा जाहीर केला. 8 दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यासोबतच त्यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांची नावे सूचवली. यातील 10 ते 15 जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. अजूनही काही उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जात असून लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT