Maharashtra MLC election 
मुंबई/पुणे

मोठी बातमी! महायुतीचा पुण्याचा तिढा सुटला, जागावाटपाचा नवा फॉर्म्युलाही समोर, राष्ट्रवादी-शिवसेनेला कोणती जागा?

Maharashtra MLC election : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा ३-१-१ जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. भाजपला तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता असून पुणे शिक्षक मतदारसंघावर तिन्ही पक्षांचा दावा कायम आहे.

Ganesh Kavade

Mahayuti seat sharing formula Maharashtra MLC election : विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असलेला 'पुणे शिक्षक मतदारसंघ' अखेर भाजपच्या वाट्याला आला आहे. यासंदर्भात महायुतीच्या सर्व घटकांमध्ये एकमत झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

१५ संभाव्य नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सादर

या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन १५ संभाव्य उमेदवारांची यादी सुपूर्द केली आहे. भाजप महायुतीत ज्या ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे, त्या प्रत्येक जागेसाठी ५ अशा एकूण १५ नावांचा पर्याय वरिष्ठ नेतृत्वाकडे सोपवण्यात आला आहे.

महायुतीचा असा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला:

भाजप: पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर.

शिवसेना (शिंदे गट): अमरावती मतदारसंघ.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ.

इच्छुकांची समजूत काढण्याचे आव्हान

पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार दावा ठोकला होता. मात्र, दीर्घ चर्चेअंती ही जागा भाजपला देण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले. आता या जागेवर दावा सांगणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज इच्छुकांची वरिष्ठ नेत्यांकडून समजूत काढली जाणार आहे.

दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या संभाव्य नावांवर केंद्रीय नेतृत्व लवकरच शिक्कामोर्तब करणार असून, आगामी दोन दिवसांत अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रायव्हिंग लायसन्सचा नियम बदलला! पास होण्यासाठी ६० नव्हे तर ७५% गुण पाडावेच लागणार, केंद्र सरकारचा मोठा प्रस्ताव

Water Cut Alert : कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी नळाला थेंबही पाणी येणार नाही; 'या' भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Maharashtra News Live Update: पुणे पदवीधर मतदारसंघात ४०.६० टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान

Black Tongue: जीभ काळी का पडते? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

Menopause Symptoms: महिलांच्या शरीरात वयाच्या ३० वर्षांनंतर होतात हे मोठे बदल; काय आहे कारण मेनोपॉज की दुसरं काही?

SCROLL FOR NEXT