Dnyaneshwar Mhatre Saam TV
मुंबई/पुणे

Graduate Election Result: विधानपरिषदेचा पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Graduate Constituency Election Result: ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील याचा पराभव केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघ निवडणुकीतील पहिला विजय हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे पहिल्याच फेरीत विजयी झाले आहेत. त्यांना 20648 मतं मिळाली, तर शिक्षकांची 3002 मते अवैध ठरली आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. गुलाल उधळत सर्व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आनंद साजरा केला. यावेळी मतमोजणी केंद्रावर ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कुटुंबीय देखील उपस्थित आहेत. (Latest Marathi News)

आपल्या विजयानंतर बोलताना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटलं की, हा विजय सर्व शिक्षकांचा आहे. मला सर्व संघटना आणि पक्षाचा चांगला पाठिंबा असल्याने हा विजय शक्य झाला. शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार, असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

बाळाराम पाटील यांनी पराभवानंतर म्हटलं की, निकाल आलाय तो स्वीकारला आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाला आहे. पण त्या मुद्द्याकडे न जाता कोकणच्या शिक्षकांनी जो कौल दिला तो मान्य करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT