'बहुत याराना लगता है' म्हणत फडणवीस आणि मालेगाव बॉम्बस्फोटामधील आरोपीचा व्हिडीओ ट्विट  Saam TV
मुंबई/पुणे

'बहुत याराना लगता है' म्हणत फडणवीस आणि मालेगाव बॉम्बस्फोटामधील आरोपीचा व्हिडीओ ट्विट

हा व्हिडीओ भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांच्या मुलीच्या रिसेप्शनमधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. आणि याच मालेगाव बॉम्बस्फोट मधील एक आरोपी असणारे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हस्तांदोलन करत असतानाचा एक व्हिडीओ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे तसचं त्यांनी या ट्विटच्या खाली 'बहुत याराना लगता है' असं देखील लिहलं आहे.

सदरचा व्हिडीओ हा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांच्या मुलीच्या रिसेप्शनमधील असून यावेळी भाजपनेते प्रविण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असतानाच कर्नल पुरोहित देखील त्या ठिकाणी येतात आणि फडणवीस त्यांच्या हातात हात मिळवताना दिसत आहेत. आणि त्यावरुनच आता सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी फडणवीसांवरती खोचक टीका केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT