Mumbai Virar Viral Pani Puri Store Video Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video : सावधान! मुंबईत पाणी पुरीच्या ठेल्यावर आढळला साप, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Mumbai Virar Viral Pani Puri Store Video : विरारमध्ये पाणीपुरीच्या ठेल्यावर साप आढळल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे उघड्यावरच्या स्ट्रीट फूडच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Alisha Khedekar

  • विरारमध्ये पाणीपुरीच्या ठेल्यावर साप आढळला

  • साप पाणीपुरीच्या पाण्याच्या व रगड्याच्या भांड्यात फिरताना दिसला

  • ग्राहकाने हा प्रकार पाहून दुकानदाराला सूचना दिली

  • सुदैवाने सर्पमित्रांच्या मदतीने साप सुरक्षितरीत्या पकडण्यात आला

पाणी पुरी हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे. ही पाणी पुरी कुठे खावी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर अनेकदा उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळा असे सांगतात. मात्र स्ट्रीट फूड हे चटक लावणारे असतात. हे चटक लावणारे पदार्थ जीवघेणे ठरू शकतात. कारण हे पदार्थ कुठे बनतात, कोणत्या तेलात बनतात याची आपल्याला कल्पना नसते. दरम्यान मुंबईतील विरारमध्ये एका परिसरात पाणी पुरीच्या ठेल्यावर साप आढळल्याची व्हिडिओ समोर आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, रस्त्यावर एक पाणी पुरीचा ठेला लागला आहे. या ठेल्याच्या मागे भरपूर कचरा आहे. आणि काहीजण या ठेल्यावर पाणी पुरी खाण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत. याचदरम्यान पाणी पुरीच्या ठेल्यावर एक हिरव्या रंगाचा साप लाल कपड्याच्या आतून येताना दिसतो आहे.

नंतर हा साप पाणीपुरीच पाणी ठेवलेल्या भांड्यावर फिरताना दिसतो आहे. त्यानंतर या सापाने रगडा ठेवलेल्या भांड्यात तोंड बुडवले. हा सगळा प्रकार एका ग्राहकाने बघताच त्याने दुकानदाराला कळवले. दुकानदाराने लगेचच बाजूचे लाकूड उचलून सापाला तिथून काढण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने सर्पमित्रांनी किंवा स्थानिक नागरिकांच्या मदतीने सापाला सुरक्षितरीत्या बाजूला करण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. याच दरम्यान एका ग्राहकाने हा व्हिडिओ चित्रित केला. हा प्रकार पाहून उघड्यावरचे खाणे किती धोकादायक ठरू शकते हे समोर आले आहे. या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT