Mumbai Police Saam TV
मुंबई/पुणे

राणा दाम्पत्याबाबत व्हिडीओ बॉम्ब फुटणार, शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट

अमरावतीचे अपक्ष खासदार नवतीन राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अमरावतीचे अपक्ष खासदार नवतीन राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याच्या अडचणी आणखीनच वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली होती. तुरुंगामध्ये पाणी देखील दिले गेले नसल्याचे, आरोप (Allegations) देखील त्यांनी लावले आहेत. यानंतर मुंबईचे (Mumbai) पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन राणा यांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे. आता शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांनी आज दुपारी ३ वाजता आणखी व्हिडीओ (Video) समोर येणार असल्याचे सांगितले आहे.

हे देखील पाहा-

राणा दाम्पत्याबाबत आणखी व्हिडीओ पोलिसांकडून (police) समोर येणार असल्याचे तुमाणे यावेळी म्हणाले आहेत. सरकारवर (government) आणि पोलिसांवर राणा दाम्पत्याने लावलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देणारे व्हिडीओ समोर येणार, असे तुमाणे यांनी यावेळी सांगितले आहे. कृपाल तुमाणे यांनी मुंबई पोलिसांकडून काही व्हिडीओ आज प्रसिद्ध केले जाणार असल्याचे, सांगितले आहे. राणा यांनी पोलिसांवर आणि सरकारवर केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांकडून व्हिडीओ प्रसिद्ध केले जाणार आहेत. राणा दाम्पत्याने परमेश्वराच्या नावावर खोटे बोलण्याचे काम यावेळी केले असल्याचा आरोप तुमाणे यांनी केला आहे.

राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन (Court) कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. यामध्ये राज्य सरकार त्यांची बाजू मांडणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी घरचे जेवण मिळावे, याकरीता न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. राणा दाम्पत्याच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. नवनती राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक करण्यात आली होती. यानंतर राणा दाम्पत्याला रविवारी वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यानंतर राणा दाम्पत्याने त्यांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेले एफआयर फेटाळण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. राणा दाम्पत्याने यानंतर मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, चुकीचे वक्तव्य याविषयी गुन्हा दाखल केले आहेत. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचे कलम देखील लावण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra News Live Update: बारामतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नागरिकांची धावपळ

OTT Weekend List: वीकेंडला पार्टनरसोबत घरी निवांत वेळ घालवायचा आहे का? मग पाहा या 7 रोमँटिक वेब सीरिज

TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा! पीडित तरुणीला दाखवले व्हिडिओ, मौलाना कनेक्शन उघड

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, OBC प्रमाणे ८ योजनांचा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT