Versova to Virar Sea Link News Saam Tv
मुंबई/पुणे

Versova to Virar Sea Link: वर्सोवा ते विरार सागरी सेतूला कोळी बांधवांचा विरोध, नेमकं कारण काय?

Versova to Virar Sea Link: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाने देखील वेग घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Versova to Virar Sea Link News:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाने देखील वेग घेतला आहे. मात्र आता या सागरी सेतू मार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामाला मच्छीमार संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.

मच्छीमारांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडल्यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली आहे. एमएमआरडीए वर्सोवा – विरार दरम्यान ४२.७५ किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्याचे काम हाती घेताले आहे. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकल्पस्थळी विविध प्रकारच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. राहता या सर्व कामांना मच्छिमार बांधवांकडून विरोध होऊ लागला असून आज मुंबईच्या वर्सोवा भागात कोळी बांधवांनी एक बैठक घेऊन एमएमआरडीएच्या माध्यमातून होणाऱ्या या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका निश्चित केली आहे.  (Latest Marathi News)

सागरी सेतूसारखा महत्त्वाचा प्रकल्प राबविताना मच्छिमारांनाच विश्वासात घेण्यात आलेले नाही, असा आक्षेप मच्छिमारांनी घेतला आहे. या प्रकल्पामुळे मच्छीमारी व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यामुळे मच्छीमारांशी चर्चा करणे आवश्यक होते. पण तसे न करता प्रकल्प राबविण्याची तयारी करण्यात येत असल्याचा आरोप मच्छीमार संघटनांकडून केला जात आहे.

आज झालेल्या बैठकीत वेसाव मच्छीमार सोसायटी, वेसावा कोळी सर्वोदय सहकारी सोसायटी, वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड, वेसावा कोळी जमात ट्रस्ट, वेसावा कोळी मच्छिमार नाखवा मंडळ (ट्रॉलर) अशा अनेक संस्था सागरी सेतूच्या विरोध मध्ये भाग घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा आता पोहोचला चारवर

नगरसेवक, नेते नव्हे तर अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या २ धरणांच्या पातळीत वाढ

डोंबिवलीमध्ये मोठा घोटाळा उघड! जिल्हा परिषदेचा खोटा शिक्का वापरून इमारत ‘कायदेशीर’ दाखवली

SCROLL FOR NEXT