रश्मी पुराणिक -
मुंबई: उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे ‘सीएनजी’, ‘पीएनजी’ आजपासून स्वस्त झाले आहे (VAT reduced by Deputy CM Ajit Pawar In Budget CNG and PNG cheaper from today).
व्हॅट (VAT) कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस (GAS) तसंच वाहनांसाठीचे सीएनजी (CNG) इंधन स्वस्त झाले आहे. महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर पीएनजी (PNG) हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. (CNG Fuel price News updates)
नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो, तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असेल.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.