Viral Video  Saam TV
मुंबई/पुणे

Viral Video : अगं मुलींनो आवरा स्वत:ला... भर रस्त्यात पप्पाच्या 4 पऱ्यांचा स्कुटीवरचा थरार, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर मुलींच्या थरारक करामतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

Girls Viral Video : महिला सध्याच्या युगात कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. प्रत्येक ठिकाणी त्या आपलं नाव कमवत आहेत. अशात वाहन चालवण्यामध्ये देखील मुली मागे राहिलेल्या नाहीत. सोशल मीडियावर रीक्षा चालक ट्रक चालक महिलांचे अनेक प्रेरणादायी व्हिडिओ समोर आले आहेत. त्यातच पापा की परी या गाण्यावर मीम्समधील अनेक व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर मुलींच्या थरारक करामतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Vashi News)

मुलींचे दुचाकी किंवा चारचाकी चालवतानाचे अनेक व्हिडिओ आजवर समोर आले आहेत. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की, मुलींची करामत पाहून समोरच्याला हसू आवरत नाही. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटकरी या मुलींवर संताप व्यक्त करत आहेत. सदर व्हिडिओ हा एका हायवेवरील आहे. येथे चार मुली एका दुचाकीवर स्वार आहेत. या चौघींनी देखील वाहतुकीचे सर्वच नियम मोडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशी (Vashi) येथील पाम बीच रोडवरील हा व्हिडिओ आहे. यामध्ये या चारही मुलींनी डोक्यावर हेल्मेट घातलेलं नाही. तसेच स्कूटीवर त्या अगदी चारचाकीला मागे टाकत बुलेटच्या स्पीडने स्कूटी चालवत आहेत. कारमध्ये बसलेला एक व्यक्ती व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना अचानक या मुलींची दुचाकी त्यांच्या फोन समोर येते आणि क्षणात गायब होते. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

बुलेटच्या स्पीडमध्ये सेल्फीचा नाद

रुपाली शर्मा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की, या चारही मुलींनी वाहतुकीचे सर्व नियम मोडले आहेत. दुचाकीवर बसलेल्या चार मुलींपैकी दुसरी मुलगी दुचाकी चालवत होती. या मुलींचा अपघात होण्याची दाट शक्यता असतानाच त्यांनी आणखी एक मोठी चूक केली. वेगात दुचाकी चालवताना त्या सेल्फी काढत होत्या.

सोशल मीडियावर मुलींचा हा व्हिडिओ पाहून सर्वच जण संतपप्त प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत १२ हजारांहून अधिक व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT