Vasai's Shailesh Industrial Building Caught Fire Saam tv
मुंबई/पुणे

Vasai Fire: वसईत खेळणी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी

Vasai Fire News in Marathi: वसईतून मोठी बातमी समोर आली आहे. वसईत खेळणी बनविणाऱ्या शैलेश इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज गुरुवारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, वसई

Vasai Fire News in Marathi :

वसईतून मोठी बातमी समोर आली आहे. वसईत खेळणी बनविणाऱ्या शैलेश इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज गुरुवारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. या आगीची मिळताच अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत. कंपनीला नेमकी आग कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वसईत खेळणी बनवणाऱ्या शैलेश इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागली. आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या घटनेत कोणती जिवीतहानी झालेली नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये गोडाऊनला आग

पिंपरी चिंचवड शहरातील त्रिवेणी नगर भागात एका सजावट वस्तूच्या गोडाऊनला भीषण आग लागली.

आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीमुळे गोडाऊन मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. शॉर्टसर्किटमुळे सजावट वस्तूच्या गोडाऊनला आग लागली असावी, असं अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

या सजावट वस्तूच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत एक गॅरेज देखील जळून खाक झालं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवळपास 10 अग्निशमन बंब वाहनांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bharat Jadhav- Mahesh Manjrekar: भरत जाधव अन् महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, नवीन नाटकाचा प्रयोग कधी?

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत ₹१५००; सरकारने दिला इशारा

SCROLL FOR NEXT