Amaravati Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Amaravati Politics : अमरावतीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठा ट्विस्ट; उमेदवार मागे घेत आनंदराज आंबेडकर यांना दिला पाठिंबा

Vanchit Bahujan Aghadi letter to anandraj ambedkar : आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा मिळत नसल्याने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज गुरुवारी वंचित बहुजन आघाडीने आनंदजराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Vishal Gangurde

Vanchit Bahujan Aghadi support to Anandraj ambedkar :

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अमरावतीत वंचित बहुनज आघाडीने उमेदवारी जाहीर केला होता. त्याच मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे देखील रिंगणात उतरले आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा मिळत नसल्याने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आज गुरुवारी वंचित बहुजन आघाडीने आनंदजराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकरांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकर यांना पत्र लिहित म्हटलं की,'तुम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तुमच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर करेल. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार अर्ज भरणार नाही, असे आपल्याला पक्षाकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या उमेदवाराला अर्ज दाखल करू नये अशी स्पष्ट सूचना आम्ही दिली. त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यात आलेला नाही'.

'तुम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघात लढणार असाल तर आधी ठरल्याप्रमाणे आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा राहील. त्यामुळे आपण अर्ज मागे घेऊ नये आणि उमेदवारी कायम ठेवावी अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही करत आहोत, असे त्यांनी जाहीर केले आहे.

अमरावतीत भाजपकडून नवनीत राणा रिंगणात

दरम्यान, अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून खासदार नवनीत राणा यांनी आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरत आदिवासी महिलांसोबत खासदार नवनीत राणा यांनी खाली बसून जेवण करण्याचा आनंद घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT