Vaishnavi Hagawane Case saam tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: जावयाला दिलेल्या मोबाइलचे हप्ते फेडतोय; वैष्णवीच्या वडिलांनी हगवणेंच्या दाव्याची केली पोलखोल

Vaishnavi Hagawane Case: माझ्याकडे गाडी,चांदीच्या ताटाची मागणी सोन्याची मागणी करण्यात आल्या. माझ्या मुलीचे दोन लग्न मोडली त्याला हगवणे कुटुंब जबाबदार आहे, असं अनिल कस्पटे म्हणालेत.

Bharat Jadhav

वैष्णवी हगवणेला मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे परिवाराच्या बचावासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची ते चॅट पकडले, असा दावा हगवणेंच्या वकिलांनी केला. त्याला उत्तर देण्यासाठी मृत वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत. जर आपण मोबाईल जप्त केला तर जावयाला आपण दीड लाखांचा मोबाईल का दिला, असा सवाल अनिल कस्पटे यांनी केला. हगवणे यांच्या वकिलांच्या दावा खोडून काढण्यासाठी अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषदेत मोबाईल आणि गाडीचं बिल दाखवले.

शशांकने आमच्याकडून दीड लाखांचे मोबाईल घेतले, त्याची ही पावती. आज ही मी हफ्ते भरतोय. असं अनिल कस्पटे यांनी पत्रकारांना सांगितले. हगवणे यांनी लग्न ठरवताना आमच्यावर दबाव टाकला. सोन्याची मागणी केली. आमच्या लेकीचं लग्न आधी दोनदा मोडलं होतं. त्यामुळे आम्ही हुंडा देण्यास तयार झालो, असेही अनिल कस्पटे म्हणाले.दाखवल्या.

'लग्नानंतर शशांकने माझ्याकडे लाख रुपयाचा मोबाईल मागितला. १८ डिसेंबर २०२४ रोजी क्रोमाच्या शोरुममधून शशांकसाठी फोन घेतला. त्याची पावती आमच्याकडे आहे. त्या फोनचे हफ्ते मी आजही फेडत आहे,' असा दावा कस्पटे यांनी केला. लग्नानंतर अधिक महिन्यात जावयाला भेटवस्तू द्यायची प्रथा आहे.

प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू देतो. यांनी आमच्याकडून चांदीची ताटं मागून घेतली, असंही कस्पटे म्हणाले. अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषदेत मोबाईल पावत्या देखील हगवणे यांच्या वकिलांना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यावरून बोलताना अनिल कस्पटे म्हणाले, असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलणं चुकीचे आहे. मोबाईल चॅटिंगबाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती, कुठलाही माहिती दिली नव्हती.

माझ्या मुलीवर चारित्र्याचा संशय घेतलाय. माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला जर मोबाईल काढून घ्यायचा असेल तर मी तिला मोबाईल कशाला दिला. जावई याला १ लाख ५२ हजाराचा मोबाईल दिला होता असं कस्पटे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT