Vaishnavi Hagawane Case 
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Death Case: आत्महत्येपूर्वी वैष्णवीला ६ दिवस वेगवेगळ्या हत्यारानं मारहाण; पत्रकार परिषदेत बोलताना वडिलांना अश्रू अनावर

Vaishnavi Hagawane Case : पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीला हगवणे कुटुंबीयांकडून मारहाण होत होती, असा आरोप करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना बुधवारी न्यायालयाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली. कोर्टातील सुनावणीनंतर हगवणेंच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण आलं. त्यावरून मृत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत हगवणे यांच्या दाव्यांची पोलखोल करत त्यांच्यावर परत एकदा गंभीर आरोप केलेत.

यावेळी बोलताना अनिल कस्पटेंना अश्रू अनावर झाले. माझी मुलगी तर आता परत येणार नाही, पण आपल्या मृत मुलीला न्याय द्या असं ते रडताना बोलत होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद संपवली. हगवणे यांच्याकडे पाच अलिशान गाड्या आहेत, त्यामुळे गाडीसाठी वैष्णवीचा छळ केला नाही. शिवाय नवऱ्यानं एक चापट मारली तर त्याला सासरवास किंवा छळ म्हटलं जात नाही, असा दावा हगवणेंचे वकिलांनी केला.

वकिलांचा दाव्याला उत्तर देण्यासाठी आज मृत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि दाव्यांची पोलखोल केली. आत्महत्येपूर्वी वैष्णवीला ५ ते सहा दिवस मारहाण करण्यात आली होती असा गंभीर आरोप कस्पटे यांनी केलाय. हगवणे कुटुंबियांमुळे माझ्या मुलीचे लग्न दोन वेळा तुटले. त्यामुळे नाईलाजाने मला मुलीचे लग्न करावे लागले. आता तपासात अत्यंत मोठी माहिती पुढे आलीय. शशांक हगवणे हा वैष्णवीला ५ दिवस आणि नंतर ३ दिवस वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण करत होता.

वैष्णवी मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करत होती, ही चॅटिंग आम्हाला सापडली होती. त्यावरून तिचा मोबाईल तिच्या घरच्यांनी काढून घेतला होता, यावर बोलताना कस्पटे यांनी वकिलांना खडेबोल सुनावले. काल आरोपी वकील बोलले ते ऐकले आहे समाजाने ऐकले. ते चुकीचे बोलले असून असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलले हे चुकीचे आहे. माझ्या मुलीचा बळी याला वेगळी कलाटणी द्यायची आहे.

मोबाईल चॅटिंगबाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती. कुठलाही माहिती दिली नव्हती. माझ्या मुलीवर चारित्र्याचा संशय घेतलाय. ते चुकीचं आहे, असं अनिल कस्पटे म्हणाले. वैष्णवीची चॅटिंग सापडली म्हणून आम्ही मोबाईल काढून घेतला असा दावा केला जातोय. तर मी तिला मोबाईल दिला कशाला, असंही कस्पटे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT