Jalinder supekar Transfer update Saam tv
मुंबई/पुणे

Jalinder supekar Transfer : वैष्णवी हगवणे प्रकरण भोवलं; विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची बदली

Jalinder supekar Transfer update : जालिंदर सुपेकर यांना वैष्णवी हगवणे प्रकरण भोवलं. विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

Vaishnavi hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून कारवाईचा सपाटा लावला आहे. या प्रकरणात हगवणेच्या कुटुंबातील काही सदस्यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे आज वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. त्यानंतर हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने मोठा दणका दिला आहे. जालिंदर सुपेकर यांची उपमहासमादेशक होमगार्ड या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात चर्चेत असलेले अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची बदली झाली आहे. त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र या पदावरून मुक्त करण्यात आलं आहे. त्यांची उपमहासमादेशक, होमगार्ड या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्यांची विशेष पोलिस महानिरीक्षक पदावरून पद अवनती झाली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे जालिंदर सुपेकरांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

अंजली दमानिया यांनी केला गंभीर आरोप

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शशांक हगवणे मामा विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ऑडिओ क्लिपसमोर आणली होती. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावरुन गृहविभागाने कारवाई केल्याचं समजते.

जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काल काढून घेण्यात आला. त्यानंतर आज शुक्रवारी त्यांची उपमहासमादेशक, होमगार्ड या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. आता या प्रकरणात सुपेकर यांची चौकशी होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT