Nilesh Chavhan Saam
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Case: हगवणेंच्या दोन्ही फोनमधून महत्त्वाचे पुरावे समोर, चॅटिंग अन् आर्थिक व्यवहाराची माहिती उघड

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तपासाला वेग आला असून, या प्रकरणात पोलिसांनी निलेशकडून वैष्णवी हगवणे कुटुंबीयांचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

Bhagyashree Kamble

वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात निलेश चव्हाण याच्यावर संशय अधिक बळावला असून, पोलिसांनी निलेशकडून वैष्णवी हगवणे कुटुंबीयांचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

तपासातून निलेश चव्हाणचं हगवणे कुटुंबासोबत झालेलं चॅटिंग आणि आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी निलेशला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. याला मंजूरी मिळाली आहे.

सरकारी वकिलांनी बाजू मांडताना अनेक खुलासे केले आहेत, तपासात मिळालेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाण याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हगवणे कुटुंबाचे २ मोबाईल निलेशकडे असल्याची माहिती आहे. यादरम्यान, निलेशचं हगवणे कुटुंबासोबत चॅटिंग झालं होतं. तसेच आर्थिक व्यवहारही झाले आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी निलेशला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची न्यायालयाकडे केली होती. याला न्यायालयाने मंजूरी दिली आहे.

वैष्णवीच्या बाळाची हेळसांड

तपासादरम्यान, एक महत्त्वाचा मु्द्दा समोर आला आहे. वैष्णवी हगवणेचे लहान बाळ काही काळासाठी निलेश चव्हाणकडे होतं. त्या काळात त्याने त्या बाळाची योग्य काळजी घेतली का? की बाळाची हेळसांड झाली? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, शशांक हगवणे आणि लता हगवणे यांचा ताबा सध्या म्हाळुंगे पोलिसांकडे आहे. या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

SCROLL FOR NEXT