Vaishnavi Hagawane latest news  Saam tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेसोबत १६ मेआधी काय काय घडलं? सगळं गूढ उकलणार

Vaishnavi Hagawane latest news : वैष्णवी हगवणे प्रकरणाची मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना २८ मेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना कोर्टात हजर केलं. या तिघांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी सुद्धा 28 तारखेपर्यंत आहे. वैष्णवी हगवणेसोबत १६ मेआधी काय काय घडलं, याचं संपूर्ण गूढ आता पोलीस तपासात उकलणार आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीच्या अंगावर असलेले व्रण म्हणजेच त्यांना ज्या हत्याराने मारहाण केली, त्या हत्यारांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यामळे ते हत्यार नेमके ठेवले कुठे आहे, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानंतर न्यायालयाने या तिघांना आता 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

वैष्णवी हगवणेने आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणेचा कुटुंबियांकडून छळ केला जात असल्याचं समोर आलं आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे २९ व्रण आहेत. तर त्यातील ५ ते ६ व्रण ताजे आहेत. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.

कोर्टात पोलिसांनी यावेळी महत्वाचे मुद्दे मांडले. पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांचे सर्व बँक पोलिसांनी गोठवले आहे. वैष्णवीचे सोने का तारण ठेवले आणि त्यातून येणाऱ्या रकमेचे हगवणे कुटुंबीयांनी काय केलं, याचा तपास पोलिसांकडून बाकी आहे. फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांचा संबंध पोलिसांना तपासायचा आहे. पोलिसांना हगवणे कुटुंबीयांची एकत्र चौकशी करायची आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Kapoor Daughter: अनिल कपूरच्या लेकीला मोठा धक्का; कोट्यवधींचे हिऱ्यांचे कानातले चोरीला, सिनेसृष्टीत खळबळ!

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

Hardik pandya trade: आधी हार्दिकला घेतलं आता यशस्वीवर डाव खेळणार? MI-RR मध्ये मोठ्या ट्रेडची चर्चा

पवनराजे निबांळकर हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उचललं महत्वाचं पाऊल, काय निर्णय घेतला?

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल विरोधात लागला; ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT