Money Heist Song | Money Heistच्या गेटअपमधून कोण देतय लसीकरणाचा संदेश (पहा व्हिडीओ)  Khasreyoutube/SaamTV
मुंबई/पुणे

Money Heist Song | Money Heistच्या गेटअपमधून कोण देतय लसीकरणाचा संदेश (पहा व्हिडीओ)

Money Heist बेव सीरिज मधील कलाकारांची वेषभूषा करुन पुण्यातील काही तरुणांनी रस्त्यांवरती उतरुण, गाणे म्हणत नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : नेटफ्लिक्सवरील Netflix बहुप्रितिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’च्या MoneyHeist पाचव्य़ा सिझनचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला ३ सप्टेंबरला आला आणि त्या वेब सीरिज मधील कलाकारांची वेषभूषा Costume करुन पुण्यातील काही तरुणांनी रस्त्यांवरती उतरुण, गाणे म्हणत नागरिकांना लसvaccinne घेण्याचे आवाहन केले होते. हे पथनाट्य आहे का? हे तरुण कोण आहेत? ही कुठली सामाजिक संस्था आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तसेच या तरुणांचे व्हिडिओजही video गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावरती Social Media मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत हे युवक कोण आहे यावरून आता पडदा उठला असून ही आहे टीम 'खास रे'! Vaccination message from Money Heist's Getup

पहा व्हिडीओ-

कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन शिथील केल्यानंतर पुण्यातील नेहमीच्या गजबजलेल्या रस्त्यांवरती काही युवकांनी अचानक फिल्मी स्टाईलने लस घेण्याचं आवाहन करण्यास सुरुवात केली. पुणेकरांना आधी हे नेमकं काय चाललंय कळेनास झालेलं नंतर मात्र हा माहौल पुणेकरांनी एन्जॉय केला. काही नागरिक अजूनही कोरोना नियमांबाबत गाफील आहेत. नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत तसेच लसींबद्दल ही वेगवेगळे संभ्रम पसरविले जात आहेत या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांचे मनोरंजनात्मक पध्दतीने जनजागृती करण्यासाठी हे गाणं केल्याचं टीम 'खास रे' आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नेहमीच डिजीटल प्लॅटफॉर्मवरती Digital Platform खासरे टीम आपले वेगळेपण जपत असते आणि यावेळीही त्यांनी आपल्या आगळ्या-वेगळ्या थीम मधुन नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. गाण्याची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन संजय श्रीधरचं असून संदेश कालेकरनं संगीत बद्ध केलेल़ं हे गाणं निरंजन पेडगावकरनं गायलं आहे. दरम्यान 'लस घ्या लस घ्या' हे गाणं लवकरच 'खास रे' च्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून गाण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT