Urban Naxal Case: डॉ. आनंद तेलतुंबडे (Dr. Anand Teltumbde)
Urban Naxal Case: डॉ. आनंद तेलतुंबडे (Dr. Anand Teltumbde) Saam TV
मुंबई/पुणे

Urban Naxal Case: डॉ. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा; वृद्ध आईला भेटण्यासाठी मुंबई हायकोर्टाने दिली परवानगी

सुरज सावंत

मुंबई: अर्बन नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. डॉ. तेलतुंबडे यांना त्यांच्या वृद्ध आईला भेटण्यासाठी मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यांना 8 आणि 9 मार्च रोजी आईला चांद्रपूर येथे भेट घेण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिली आहे. ते सध्या नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये आहेत. (Urban Naxal Case: Consolation to Dr. Anand Teltumbde; Mumbai High Court gives permission to visit elderly mother)

हे देखील पहा -

मात्र तेलतुंबडे यांना 11 मार्चला तळोजा तुरुंगात परत आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ह्या भेटीसाठी येण्याचा-जाण्याचा सर्व खर्च तेलतुंबडे यांना स्वत: करावा लागणार आहे, मात्र पोलीस सुरक्षेबाबतचा खर्च राज्य सरकारला करण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारला निर्देश दिले आहेत.

कोण आहेत डॉ. आनंद तेलतुंबडे?

भीमा कोरेगाव हिंसा आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावई डॉ. आनंद तेलतुंबडे यांना कोर्टाने शरण जाण्यास सांगितले होते, त्यानुसार १४ एप्रिल २०२० रोजी त्यांनी एनआयएसमोर शरणागती पत्करली होती सोबतच नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनीही एनआयएसमोर शरणागती पत्करली होती. आंबेडकर जयंती दिनीच आंबेडकरांच्या नातजावयाला अटक करण्यात आल्याने आंबेडकरी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

Iran News: इराण राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की इस्त्रायकडून घातपात?

SCROLL FOR NEXT