chandrakant patil news  saam tv
मुंबई/पुणे

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक; हल्लेखोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Chandrakant Patil : भाजप नेते, मंत्री चंद्रकात पाटील यांनी काल औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ' कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून चौफेर टीका झाली. त्यानंतर आज, शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक करण्यात आली आहे. शाईफेक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चौक पोलीस बंदोबस्त असूनही काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली आहे. चंद्रकांत पाटील हे आज चिंचवड गावात मोरया गोसावी महोत्सवासाठी हजर झाले आहेत. त्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली आहे.

घटनेनंतर शाईफेक करणाऱ्याला चंद्रकांत पाटील यांचया कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

"कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. यावेळी सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. तेव्हा त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा सुरु करायच्या आहेत, पैसे द्या. तेव्हाच्या काळात लोकांनी १० रुपये दिले. आता १० कोटी देणारे लोक आहेत" असं वक्तव्य त्यांनी केलं. पैठणमध्ये एका सभेला संबोधीत करताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT