Nitin Gadkari saam tv
मुंबई/पुणे

Nitin Gadkari : ज्यांना मोठं समजत होतो, तेच छोटे निघाले; नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nitin Gadkari News : भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. दिल्लीत गेल्यावर मला एक गोष्ट जाणवली ज्यांना मी खूप मोठं समजत होतो, ती लोकं फार छोटी निघाली, असं वक्तव्य नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं. एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे गडकरी यांचा नेमका रोख कुणाकडे? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Breaking Marathi News)

काय म्हणाले नितीन गडकरी?

मुंबई (Mumbai) आयआयटीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी दिल्लीचं पाणी चांगलं नाही. दिल्लीत खूप हुशारीने काम करावं लागतं, दिल्लीत ज्यांना मी मोठं समजायचो ते मोठे नव्हते आणि ज्यांना मी छोटा समजायचो ते खूप मोठे निघाले, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

'पुढच्या वेळेस ५ लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार'

मला दिल्लीत जेव्हा संधी मिळाली तेव्हा अनेकांना भेटलो. मी एकाला दिल्लीत म्हणालो की दिल्लीचं पाणी चांगलं नाही, महाराष्ट्र खूप चांगला आहे. दिल्लीत खूप हुशारीने काम करावं लागतं, मी माझ्या मतदारसंघात साडेतीन लाख मतांनी जिंकलो, पुढच्या वेळेस पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Nitin Gadkari News Today)

अहंकारामुळं अनेकदा मॅनेजमेंट लेव्हलला अडचणी निर्माण होतात. संबंध कसे असावे हा सगळीकडेच महत्वाचा विषय आहे, आपण आयात काय करतो ते बघा. त्याला पर्याय शोधा, त्यावर रिसर्च करा त्याचा खूप फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले. मला पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचं आहे, हा एक अवघड संकल्प असल्याचेही गडकरी यांनी म्हटलं आहे.

'ई-बसनंतर ई-ट्रक लॉन्च करणार'

देशात ई-हायवे बनवण्याचा आमचा प्लॅन आहे. त्यासाठी तुमची मदत हवी असल्याचे गडकरी म्हणाले. रिसर्च करा मी त्याला इन्करेज करतो असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पुढच्या महिन्यात ई-बसनंतर ई-ट्रक लॉन्च करणार असल्याचेही गडकरी म्हणाले. तसेच मला पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचं आहे, हा एक अवघड संकल्प असल्याचे गडकरी म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT