Narayan Rane And Uddhav Thackray Saam Tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंनी एकही क्षण मुख्यमंत्रीपदावर राहायला नको; नारायण राणेंचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे व नाराज आमदारांना घेऊन गुजरातच्या सुरत येथे गेल्यानंतर राज्यात खलबतं सुरू झालं आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याचा राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व नाराज आमदारांना घेऊन गुजरातच्या सुरत येथे गेल्यानंतर राज्यात खलबतं सुरू झालं आहे. त्यामुळे सकाळपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'एकनाथ शिंदे नामधारी मंत्री होते. नगर विकास खात्यात आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिकार होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकही क्षण मुख्यमंत्रीपदावर राहायला नको, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. (Maharashtra Political News In Marathi )

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या पत्रकार परिषदेत राणे यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले, 'आज २१ जून रोजी राज्यात एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांची वारंवार अपमानाची वागणूक, वेगवेगळी दिलेली आश्वासन आणि फसवणूक यातून त्यांचा स्वाभिमान जागा झाला आहे. मुख्यमंत्री असूनही पक्षप्रमुख असताना अडीच वर्षे पक्ष सांभाळता आला नाही. शिवसैनिकांना भेटी नाही, फक्त पिंजऱ्यातून आदेश द्यायचा'.

'शिवसेनेचे प्रतिनिधी त्यांना भेटले, पण त्यांनी स्पष्ट सांगितले. भाजपसोबत आला तर आम्ही विचार करू याचा अर्थ शिंदेंची भूमिका हिंदुत्वाची आहे. मुख्यमंत्री यांनी एकही क्षण मुख्यमंत्रीपदावर राहायला नको. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तो दिला नाही. शिंदे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, अन्यथा जे काही दिघेंसोबत घडलं असतं'. नारायण राणे पुढे म्हणाले, 'एकनाथ शिंदे नामधारी मंत्री होते. नगर विकास खात्यात आदित्य ठाकरे आणि त्यांचा नातेवाईकांना अधिकार होते'.

यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊतांवर देखील जोरदार निशाणा साधला. नारायण राणे म्हणाले,'संजय राऊत यांचा आज आवाज बसला आहे. शिवसेनेत संजय राऊत यांना कोणी घाबरत नाही. वर्षावर चर्चेसाठी केवळ ११ आमदार होते. त्यांना ५६ लोकांचा गटनेता नको आहे. ठाकरेंनी वर्षावर थांबायला नको. असे पक्षप्रमुख असतात का'. तर शिंदे हे शिवसेनेच्या जडणघडणीपासून आहेत. त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता, संजय राऊतांनी शिवसेना संपवली, अशी टीकाही राणे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT