गृहमंत्री अमित शहांचा मुक्काम अजित पवारांच्या VVIP सूटमध्ये Saam TV
मुंबई/पुणे

गृहमंत्री अमित शहांचा मुक्काम अजित पवारांच्या VVIP सूटमध्ये

पुण्यात ते भाजपच्या कार्यकर्त्यांची भेट घेवून संवाद साधणार आहेत.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांच्या मुक्कामासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी VVIP सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या ताब्यातील सूट उपलब्ध करून दिले आहे. शहा यांनी सरकारी निवासस्थानांमध्येच राहण्याची व्यवस्था करावी, अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला दिल्या होत्या. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने VVIP सर्किट हाउसमध्ये ते राहणार आहेत. पुण्यात ते भाजपच्या कार्यकर्त्यांची भेट घेवून संवाद साधणार आहेत.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नगरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर प्रवरानगरला अमित शहा यांच्या उपस्थितीत सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा पार पडणार आहे. या परिषदेची जय्यत तयारी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 20 ते 25 हजार जण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत, असं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रात प्रथमचं स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) पहिल्यांदाचं प्रवरानगरला सहकार परिषदेसाठी येत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

SCROLL FOR NEXT