Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Bar News : मुंबईतील प्रसिद्ध बारमध्ये अल्पवयीन मुलींना दिली दारू, दोघींची प्रकृती खालवल्यामुळे खळबळ

Mumbai News : मुंबईतील एका बारमध्ये अल्पवयीन मुलींना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • अंधेरीतील बारमध्ये अल्पवयीन मुलींना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार

  • दोन मुलींची प्रकृती बिघडून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

  • ओशिवरा पोलिस आणि एक्साईज विभागाची चौकशी सुरू आहे

  • बार व्यवस्थापनावर बॉम्बे प्रोहिबिशन अ‍ॅक्ट आणि बाल संरक्षण कायद्यानुसार कारवाईची शक्यता आहे

संजय गडदे, मुंबई

अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला परिसरात असलेल्या HOPS Kitchen & Bar (ज्याला All Spice Kitchen & Bar म्हणूनही ओळखले जाते) येथे अल्पवयीन मुलींना दारू दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर दोन मुलींची तब्येत बिघडल्याने त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १६ वर्षांची आणि २१ वर्षांची दोन मुली या बारमध्ये गेल्या होत्या. बारमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे वय किंवा ओळखपत्र तपासल्याशिवाय त्यांना व्होडका दिल्याचा आरोप आहे. काही वेळातच दोघींची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालय सूत्रांच्या मते, दोघीही रुग्णालयात आल्या तेव्हा त्या मद्यप्राशनाच्या अवस्थेत होत्या.

याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याने बार व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेज, परवाने आणि संबंधित स्टाफची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात दिल्या गेलेल्या दारूची गुणवत्ता संशयास्पद असल्याचे समोर आले असून, नकली किंवा निकृष्ट दर्जाची दारू वापरली गेली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता एक्साईज विभाग यावर कोणती कारवाई करणार? असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “अल्पवयीनांना दारू देणे हा गंभीर गुन्हा असून, अशा ठिकाणांवर केवळ पोलिसांनीच नव्हे तर एक्साईज विभागानेही धडक कारवाई करावी.”

जर आरोप सिद्ध झाले, तर बार व्यवस्थापनावर बॉम्बे प्रोहिबिशन अ‍ॅक्ट आणि बाल संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की, मुंबईतील अनेक बार आणि पब कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन अल्पवयीनांना दारू पुरवतात आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करते का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT