लॉकडाऊन शिथिल होताच दिव्यात अनधिकृत बांधकामे सुरू... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

लॉकडाऊन शिथिल होताच दिव्यात अनधिकृत बांधकामे सुरू...

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामे सुरूच असल्याने उपलब्ध सुखसुविधांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि इतर समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदीप भणगे

दिवा : दिवा diva प्रभाग समिती क्षेत्रातील लोकसंख्या मागील काही वर्षात भरमसाठ वाढली आहे. विशेषतः दिवा शहरात स्वस्त आणि परवडणारी घर Home मिळत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनी घर घेतली आहेत. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामे unauthorized construction सुरूच असल्याने उपलब्ध सुखसुविधांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि इतर समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी मिळत असून पाणी मफियांची चांदी झाली आहे. लॉकडाऊनच्या काळातही इथे काही प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू होती परंतु लॉकडाऊन Lockdown शिथिल होताच इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत. unauthorized constructions start diva

हे देखील पहा -

याबाबत भाजप ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य रोहिदास मुंडे यांनी सांगितले की, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांनी अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे मान्य करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश वजा पत्र प्रशासनाला दिले आहे. त्याबद्दल महापौरांचे आम्ही जाहीर आभार मानतो. मात्र सध्या प्रशासनाच्या डोळ्यादेखत अनधिकृत बांधकाम सुरू असल्याने या कामांना दिव्यातील शिवसेनेचे आठ नगरसेवक जबाबदार आहेत.

तसेच काही लोकप्रतिनिधींनी शासनाने गुरुचरण घोषित केलेल्या जागे मध्ये घर मांडले आहे.आम्ही दिवा प्रभाग समिती यांना विनंती करतो की दिव्यातील अनधिकृत बांधकामाचा सर्वेक्षण करून ही सर्व कामे जमीनदोस्त करून त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत बांधकाम व्यवसायिक यांच्यावर गुन्हे दाखल करून दिवेकर यांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपा ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य रोहिदास मुंडे यांच्यावतीने पालिका आयुक्त यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आता पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. तसेच भाजपच्या या आरोपाला दिव्यातील शिवसेना नगरसेवक काय उत्तर देतात हे पाहावे लागेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT