Ulhasnagar Crime Saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime: दुचाकीचा कट लागला, संतापलेल्या तरूणाने दोघांना धू धू धुतलं, उल्हासनगरमध्ये खळबळ

Youth attacked: उल्हासनगरमध्ये दुचाकीची कट लागल्याच्या रागातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. सध्या या घटनेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.एका तरुणाची प्रकृती गंभीर असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि तपास सुरू आहे.

Tanvi Pol

Road Rage Incident: उल्हासनगरच्या नेताजी चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांची कट लागल्याच्या रागातून चार जणांच्या टोळीने धारदार शस्त्राने दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना मध्यरात्री नेताजी चौकात घडली असून, या हल्ल्यातील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

रोहित लबाना आणि करणसिंग लबाना हे दोन तरुण नेताजी चौक कडून प्रभात गार्डनकडे जात होते. अनोळखी दोन बाईकस्वार तरुणांनी कट मारकी ,याचा जाब रोहित आणि करणसिंग यांनी विचारला असता त्या चार जणांच्या टोळीने सुरुवातीला शिवीगाळ करत धारधार चॉपर आणि दगडाने रोहित आणि करणसिंग वर प्राणघातक हल्ला केला.

ह्यात करणसिंगच्या छातीवर आणि खांद्यावर गंभीर वार झाले आहेत. सध्या करणसिंगची प्रकृती चिंताजनक असून त्याला मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलंय. तसेच रोहित लबाना याच्यावर देखील गंभीर वार झाले आहेत.

सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत,ह्या घटनेनंतर चार ही आरोपी हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आता ह्या प्रकरणी हिललाईन पोलीस(Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी लातूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | VIDEO

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हिवाळी अधिवेशनात मिळणार कर्जमाफीची मोठी भेट? सरकारकडून हालचालींना वेग

Gaurav More: फिल्टरपाडा ते आलिशान टॉवर; गौरव मोरेला मिळाली म्हाडाच्या नव्या घराची चावी

Navratri Day 5: आजच्या दिवशी स्कंदमाता देवीला कमळाचे फूल अर्पण करा, तुमच्या इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद रोस्टरविरोधातली याचिका नागपूर खंडपीठानंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT