उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात संघर्ष पेटला आहे. saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Politics : भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष; उल्हासनगरच्या राजकारणाला कलाटणी?

Ulhasnagar BJP Shinde Sena political conflict : उल्हासनगरच्या राजकारणाला पुन्हा वेगळी दिशा मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण स्वीकृत नगरसेवक निवडणुकीवरून शिंदेसेना आणि भाजपमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे.

अजय दुधाणे

  • उल्हासनगरमध्ये शिंदेसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष

  • स्वीकृत नगरसेवक निवडणुकीच्या मुद्द्यावर राजकारण तापलं

  • भाजप शहराध्यक्षांची हायकोर्टात धाव

  • 15 दिवसांत निवडणूक घेण्याचे हायकोर्टाचे आदेश

BJP Shinde Sena dispute in Ulhasnagar politics : स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीवरून उल्हासनगरमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील राजकीय संघर्ष चांगलंच पेटलं आहे. महापौरांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याला भाजपने विरोध दर्शवला. भाजपचे शहराध्यक्ष राजेश वधारिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. भाजपने दाखल केलेल्या याचिकेवर अवघ्या दोन दिवसांत न्यायालयात सुनावणी झाली.

उच्च न्यायालयाने स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक 15 दिवसांच्या आत घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. भाजप शहराध्यक्ष राजेश वधारिया यांनी न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. हा सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली. सत्य हे शेवटी सत्यच असतं, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी दिली.

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजप युतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. राजकीय समीकरणांच्या दृष्टीने सध्याच्या घडामोडींना महत्व प्राप्त झाले असून, आगामी काळात नेमकं काय होणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; राहुरी तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

Leg Cramps at Night: रात्री झोपेत अचानक पायात क्रॅम्प्स येतात? 'या' ६ कारणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

भाजपचा दणदणीत विजय; तब्बल 23 वर्षांनंतर काँग्रेसला बालेकिल्ल्यात मोठा धक्का

Stamp Duty: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! जमीन नोंदणीमध्ये स्टॅम्प ड्युटी कशी ठरवली जाईल? थेट नियमच सांगितला

पुण्यातील १२ दिवसांचा दारूबंदी आदेश रद्द; आता फक्त याच दिवशी ड्राय डे, हायकोर्टानंही कडक शब्दांत ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT