Ulhasnagar Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरात रिक्षा चालकास बेदम मारहाण, युवतीवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर रिक्षा चालकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरात एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याने जाणाऱ्या बाईकस्वार तरुण आणि तरुणीला बाजू न दिल्याचा रागातून ही मारहाण झाली. या घटनेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर रिक्षा चालकांत तीव्र नाराजी पसरली आहे. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार उल्हासनगर कॅम्प नंबर १ च्या बेफेक्रि चौक रस्त्याकडून रिक्षा चालक दीपक राजपूत हे जात असताना बाईकस्वार अनिषा धामेजा आणि सत्यम तिवारी यांना पुढे जाण्यासाठी बाजू दिली गेली नाही. या कारणावरून रिक्षा चालक आणि बाईकस्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा वाद विकोपाला गेला. दीपक राजपूत यास भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये दीपकचा तोंडाचा झबडा फॅक्चर झाला. सध्या त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात बाईकस्वार अनिषा आणि सत्यम तिवारी यांच्या विरोधात पाेलीसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. दरम्यान या घटनेचा रिक्षा चालकांनी निषेध नाेंदविला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT