Ulhasnagar News  Saam Digital
मुंबई/पुणे

Ulhasnagar News : उल्हासनगर इमारतीचा अर्धा भाग कोसळला घरावर, एका चुकीमुळे घडली दुर्घटना

Ulhasnagar News : उल्हासनगर शांतीनगर भागात इमारतीचे तोडफोड सुरू असताना इमारतीचा आर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला. त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे

Ulhasnagar News

उल्हासनगर शांतीनगर भागात इमारतीचे तोडफोड सुरू असताना इमारतीचा आर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला. त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कत्राटदारावर महापालिका कारवाई करणार का अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिमरन अपार्टमेंटच्या इमारतीचं तोडफोडीचं काम सुरू होतं. जेसीबीने चुकीच्या पद्धतीने तोडफोड सुरू असताना इमारतीचा अर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला. त्या इमारतीचे नाव सिमरन अपार्टमेंट आहे.मात्र उल्हासनगर मध्ये ज्या इमारती तोडल्या जात आहेत, त्यांना कुठेही तंत्रशुद्ध पद्धतीने तोडले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इमारत तोडताना कोणतीही काळजी कंत्राटदाराने न घेतल्याने सदरची दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना घडताच महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, मात्र आता तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारावर महानगरपालिका आता कोणती कारवाई करणार याची नागरिकांना प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT