Ulhasnagar Dahi Handi Latest News अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Ulhasnagar: दहिहंडीत माथेफिरुचा प्रताप; ८० फुटांवर लटकत फोडली हंडी

Ulhasnagar Dahi Handi: रात्री दहा वाजता ही दहीहंडी चांगलीच रंगात आली होती आणि शेवटचे दोन गोविंदा पथक ही दहीहंडी फोडणार होते.

अजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) दहीहंडीच्या वेळी एका माथेफिरुने प्रताप केला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात नेताजी चौकात जय भवानी मित्र मंडळाने दहीहंडी (Dahi Handi) आयोजित केली होती. या दहिहांडीसाठी 55 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवले होते. रात्री दहा वाजता ही दहीहंडी चांगलीच रंगात आली होती आणि शेवटचे दोन गोविंदा पथक ही दहीहंडी फोडणार होते. मात्र त्याच्या अगोदरच एक माथेफिरू दहीहंडीच्या एका बाजूला असलेल्या दोरीवरून लटकत लटकत दहीहंडीच्या मध्यावर आला आणि त्याने चक्क आपल्या डोक्याने दहीहंडी फोडून टाकली. (Ulhasnagar Dahi Handi News)

हे देखील पाहा -

आपल्या जीवाची परवा न करता हा व्यक्ती ८० फूट उंचावर बांधलेल्या दहिहांडीवर तो चढला आणि त्याने हा प्रताप केला. या माथेफिरूचा हा प्रताप पाहून उपस्थितांनी एकच कल्लोळ केला. दहीहंडीच्या बक्षिसाच्या आशेने आलेले गोविंदा पथक या माथेफिरूकडे बघतच बसले आणि या माथेफिरुला पोलीस घेऊन गेले. यामुळे काहीकाळ तणावदेखील निर्माण झाला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT