Ulhasnagar Sushma Patil Bribery Case News  AI Image
मुंबई/पुणे

Bribe Case : महिला अधिकारी लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकली; ठाणे जिल्ह्यात खळबळ

Ulhasnagar Bribe Case News : उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुषमा पाटील यांना सायबर फ्रॉड प्रकरणातील गोठवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून ACB ने अटक केली.

Alisha Khedekar

  • उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुषमा पाटील यांनी लाच घेतली

  • सुषमा पाटीलला पोलिसांनी अटक केली

  • सायबर फ्रॉड प्रकरणातील गोठवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी घेतली लाच

  • पुढील पोलीस तपास सुरु

उल्हासनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ताने लाच घेतल्या प्रकरणी ACB ने त्यांना ताब्यात घेतले आहे. सायबर फ्रॉड प्रकरणात गोठवण्यात आलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून सुषमा पाटील असे या लाच घेणाऱ्या अभियोक्ताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर फ्रॉड प्रकरणात गोठवण्यात आलेली रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या अर्जांवर अभिप्राय देण्याच्या बदल्यात उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुषमा पाटीलने तक्रारदाराकडे प्रत्येकी ५०० रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत विभागाने प्राथमिक पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे समोर आल्याने संबंधित अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सुषमा पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणामुळे न्यायालयीन कामकाजाशी संबंधित अधिकाऱ्यांकडून लाच मागितल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. सायबर फसवणुकीतील गोठवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी करण्यात आली का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पुढील तपासादरम्यान पडताळणी होणार असून, तपासातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत उतरून आंदोलन

सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय; शासनाकडून मिळणार पाठबळ

Kul Jamin: कुळाचा मृत्यू झाल्यानंतर कुळ जमीन वारसांना मिळते का?

Cancer : रात्री झोपताना तुम्हीही करताय का ही गंभीर चूक? कॅन्सरपासून वाचायचं असेल तर आत्ताच बदला सवय

सरकार चार पावले पुढे येत असेल तर...; एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला

SCROLL FOR NEXT