Uddhav Thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

Uddhav Thackeray Latest News : जेपी नड्डा यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील वक्तव्याचाही समाचार घेतला. 'आता आरएसएसला नकली म्हणणं बाकी आहे. भाजप आरएसएसवर बंदी आणेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

Vishal Gangurde

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी जेपी नड्डा यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील वक्तव्याचाही समाचार घेतला. 'आता आरएसएसला नकली म्हणणं बाकी आहे. भाजप आरएसएसवर बंदी आणेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

काल शिवाजीपार्कवर महायुतीची जाहीर सभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर मोदींनी उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख केला. 'इंडिया आघाडीचे सरकार आल्यास राम मंदिरवर बुलडोझर फिरवतील,अशी टीका केली. तर जेपी नड्डा यांनी आम्ही आधीपेक्षा सक्षम झालो असून स्वत:च स्वत: चालवू शकतो, असं आरएसएसच्या प्रश्नावर वक्तव्य केलं. या सर्वांचा समाचार उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत घेतला.

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'भाजपच्या मनात पाकिस्तान आहे. त्यांना अजून शरीफ यांचा केक आठवत आहे. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी पुलवामाचा हल्ला घडवून आणला का, असा प्रश्न उपस्थित व्हायला जागा आहे'.

'नकली संतान'च्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, 'आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नकली म्हणणं बाकी आहे. भाजप आरएसएसवर बंदी आणेल. कालच्या सभेत जे लोक आले होते, त्यांनी आपली दिशा ठरवावी. मोदींनी मला पण नकली संतान म्हटलं आहे. आमचं सरकार आल्यास आम्ही राम मंदिराच काम पूर्ण करू'.

उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

'आता ५० खोके फुटले आहेत. त्याचं आता वाटप सुरु आहे. जिथे मतदान कमी होणार आहे. तिथे लोकांच्या बोटांना आधीच शाई लावणं सुरू आहे. या अर्थ तिथे मतदान करता येणार नाही, असा मोठा आरोप ठाकरेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT