अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू, मात्र कर्जमाफीबाबत अजूनही मौन
विरोधकांची कर्जमाफीची जोरदार मागणी
उद्धव ठाकरे यांची शेतकरी कर्जमाफीवरून भाजपवर टीका
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या पूरस्थितीत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतकार्य सुरु आहे. दुसरीकडे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केली जात आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. याच कर्जमाफीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दसरामेळाव्याआधी भाजपला टोला लगावला आहे.
ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि कर्जमाफीवर भाजपवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात अतिवृष्टीचं संकट आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीच्या ठिकाणी जाऊन आलो. त्यावेळी तुमच्याशी बोललो. मी सरकारला विनंती केली की, आपण एकत्र येऊन मार्ग काढण्याचा विचार करू. परंतु सरकारची तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री हे त्यांच्या जाहिरातीत व्यग्र आहे. दुसरे उपमुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावर फोटो छापण्यात व्यग्र आहे. तिसरे उपमुख्यमंत्री अंगाला काहीच लावून घेत नाही. कोणताही विषय आला, तेव्हा दुसरे उपमुख्यमंत्री दिसत नाही'.
'काही साखरसम्राट भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी शेकडो करोडो रुपयांवर थकहमी मिळवली. आमची गोरगरीब शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागत आहोत. कर्जासाठी जमीन, बैल, पत्नीचं मंगळसूत्र गहान ठेवावं लागतं. काही तरी गहाण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार घेत नाही. अतिवृष्टीतमुळे शेतकरी कर्जाखाली दबले गेले आहेत. साखरसम्राटांची थकहमी सरकार घेत आहे. मग शेतकरी भाजपमध्ये आले तरच सरकार कर्जमाफी देईल का? याची वाट सरकार पाहत आहे का? ही अत्यंत संतापजनक बाब आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.