Dombivli Uddhav Thackeray UBT News Saam tv
मुंबई/पुणे

Political News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Dombivli Uddhav Thackeray UBT News : डोंबिवलीत ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला असून शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • प्रकाश तेलगोटेंचा भाजपात प्रवेश

  • शेकडो कार्यकर्त्यांचा एकत्र प्रवेश

  • डोंबिवलीत राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता

  • भाजपची ताकद वाढल्याची चर्चा

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका संपताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाची गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता डोंबिवलीत ठाकरे सेनेला भाजपने मोठा धक्का दिला आहे. उबाठाचे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.या प्रवेशाने भाजपची ताकद हळूहळू वाढत असल्याचे पाहायला मिळते आहे.

उबाठाचे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपचे नगरसेवक दिपेश म्हात्रे उपस्थित होते. या प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकाश तेलगोटे यांनी उबाठा सोडण्यामागे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनमानी आणि कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये प्रवेश करताना तेलगोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला. यामुळे भाजपची ताकद डोंबिवलीत आणखी वाढणार असल्याचे मानले जात आहे.

ठाकरे सेनेच्या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी का केली?

ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे हे हे निवडून आल्यापासूनच शिवसेना शिंदे गट यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही मधुर म्हात्रे यांनी पक्षाच्या नाव नोंदणीसह गटाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थिती लावली नाही. इतकेच नव्हे तर पालिकेच्या महासभेच्या दिवशीही पक्षाने दिलेला आदेश धुडकावले. यानंतर पक्षाने कारवाई करत मधुर म्हात्रे यांची हकालपट्टी केली. त्यानंतर मधुर म्हात्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT