Uddhav Thackeray Eknath Shinde News  Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: आमदार अपात्रता निकालाआधीच उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; निकालाच्या शक्यता सांगितल्या

Mla Disqualification News: न्यायमूर्तीच आरोपीला भेटत असतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे

Satish Daud

Shiv sena Mla Disqualification News

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी (१० जानेवारी) जाहीर होणार आहे. ठाकरे की शिंदे, कुणाचे आमदार अपात्र होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. अशातच अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक गंभीर आरोप केला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणखी वेळकाढूपणा करतील, उद्या रात्री ११:५९ पर्यंत वेळ खेचतील मग निकाल जाहीर करतील, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. न्यायमूर्तीच आरोपीला भेटत असतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा खोचक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

न्यायाधीश आणि आरोपीची मिलिभगत आहे का? असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर देखील निशाणा साधला आहे. त्याचबरोबर आम्ही दोघांच्या भेटीवर आक्षेप घेतला असून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, अशी माहितीही ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेतून दिली.

वेडावाकडा निर्णय लागल्यास जनतेला माहिती असायला हवी, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहेत. असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो, की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे. याची गंभीर दखल घेणे गरजेचं असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्रात काय म्हटलं?

ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. यात आमदार अपात्र प्रकरणात निर्णय येणे अपेक्षित असताना विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जातात ही कृती पूर्णपणे चुकीची असल्याचं म्हटले आहे. 

सोबतच विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करत विधानसभा अध्यक्ष अशा कृती करत असताना कशाप्रकारे पारदर्शकपणे निकाल देणार ? असा सवालही विचारण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाला विधानसभा अध्यक्षांची ही कृती रेकॉर्डवर ठेवावी अशी सुद्धा विनंती करण्यात आली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT