Prakash Ambedkar-Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर लवकरच भेटण्याची शक्यता, राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र दिसणार?

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक नवीन समीकरणं समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

येत्या 20 किंवा 21 नोव्हेंबरला दोन्ही नेते एकत्र येऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. ठाकरे-आंबेडकर यांच्यात युतीबाबत स्पष्टता जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नवीन युतीचा प्रयोग पाहायला मिळणार का याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आली नव्हती. मात्र आता याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकाश आंबेडकरांनी मैत्रीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिला होता. प्रकाश आंबेडकरांनी दोन ते तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आधीच म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमधून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मै अभी..; VIDEO

Maharashtra News Live Update: चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसवले.

दिल्लीतील लाठीचार्जविरोधात विरोधक आक्रमक, संसदेत काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध

दिल्लीतील पोलिसांनी लाज आणली, जंतरमंतरवर खाकीतील रक्षक की भक्षक?

शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का! बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश

SCROLL FOR NEXT