Uddhav Thackeray saam tv
मुंबई/पुणे

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? ठाकरेसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, VIDEO

BMC Election news : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ठरल्याची चर्चा आहे. ठाकरेसेना यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे.

Vishal Gangurde

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अद्याप झालेली नाही... मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका झाल्या आहेत...प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांच्या ताकदीचा विचार करून जागावाटप होणार असल्याची चर्चा आहे... त्याआधीच उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी नवी रणनिती आखलीय...मुंबईच्या राजकारणात नेहमीच मुंबई महापालिका ही केंद्रस्थानी राहिलीय.. त्यामुळे या महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काय ऱणनिती आखलीय पाहूयात...

BMCसाठी ठाकरेसेनेची रणनिती

60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी नाही

माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देणार

मुंबई पालिका निवडणुकीत 70 % नव्या चेहऱ्यांना संधी देणार

मनसे,ठाकरेसेनेची ताकद आणि प्रभाव याचा विचार करून जागावाटप

2017 च्या महापालिका निवडणुकीत संयुक्त शिवसेनेनं मुंबईत 84 जागा जिंकल्या होत्या... मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेसेनेत अनेक माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलाय... त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देऊन ठाकरेसेना नवी रणनीती आखण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढेल आणि नवं मतदारांसह जळवून घेणं ठाकरेसेनेसाठी सोप होईल. मात्र ठाकरेसेनेच्या या फॉर्म्युल्याचा मुंबई महापालिकेत किती फायदा होतो? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

SCROLL FOR NEXT