Shiv sena Mla Disqualification Case Result  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाकरे की शिंदे, कुणाचे आमदार होणार अपात्र? निकालाचं काऊंटडाऊन सुरू, आमदारांमध्ये धाकधूक

Shiv sena Mla Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. उद्या म्हणजेच १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेवर निकाल देणार आहे.

Satish Daud

Shiv sena Mla Disqualification Case Result

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. उद्या म्हणजेच १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेवर निकाल देणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कुणाचे आमदार अपात्र ठरतील, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. विशेष बाब म्हणजे, या निकालावर राज्यातील महायुती सरकारचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह विद्यमान सरकारमधील ४ मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जर अध्यक्षांनी शिंदे गटाविरोधात निकाल दिला, तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

दुसरीकडे निकाल आमच्या बाजुनेच लागेल जर, नाही लागला तर जनतेचा लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहणार नाही. याचा परिणाम निवडणुकांवरही होईल. शिवसेना कोणाची याचं उत्तर सगळ्यांना माहित आहे, असं ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार अनिल देसाईल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमदार अपात्रतेच्या निकाल येण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीत दोघांमध्ये तब्बल २ तास चर्चा झाल्याची माहिती आहे. नेमकी कोणत्या कारणावर चर्चा झाली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष बुधवारी ४ वाजता आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करतील. निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठविला असल्याची माहिती देखील मिळत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील वादात शिंदे गटाच्या बाजूले कौल दिला होता. याचा आधार देखील निकालपत्रात घेण्यात आल्याचं कळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT