Raj Thackeray Uddhav Thackeray : 
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : टाळी दोन्ही हातानं वाजली! राज ठाकरेंसोबत जाण्यास उद्धव ठाकरे तयार, पण ठेवली एक अट

Raj Thackeray Uddhav Thackeray : राज ठाकरे यांनी दिलेल्या युती प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया. “मी तयार आहे, पण भाजपसोबत की माझ्यासोबत, हे आधी ठरवा,” असं कामगार सेनेच्या मेळाव्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Responds to Raj Thackeray’s Alliance Offer : राज ठाकरेंनी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्टच सांगितले. मी सोबत यायला तयार, पण माझी एक अट आहे. माझ्याकडून सर्व भांडणं मिटली. माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, हे आधी ठरवा, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्याकडून भांडणं नव्हती. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे. पण त्याआधी भाजपसोब हित की माझ्यासोबत हे आधी ठरवा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव टाकरेंनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा, असे एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर अट घातली आहे. माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच, मी मिटवून टाकली. एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हित आहे की भाजपसोबत हित आहे, हे आधी ठरवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठी माणसाने मराठीसाठी एकत्र यावे. पण माझी एक अट आहे. लोकसभेला सांगत होतो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग घेऊन जातात, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते केंद्रात सरकार बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात बसले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT