Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray News : जगात एकच हिंदूहृदयसम्राट ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे; उद्धव ठाकरेंचा CM एकनाथ शिंदे यांना टोला

Political News : ठाणे आणि पालघर येथील भाजप, राष्ट्रवादी तसेच आम आदमी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित केले.

प्रविण वाकचौरे

Uddhav Thackeray News :

राजस्थानमधील भाजप उमेदवाराच्या बॅनरवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ठाणे आणि पालघर येथील भाजप, राष्ट्रवादी तसेच आम आदमी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित केले.

ठाण्याच्या भाजपच्या महिला पदाधिकरी ज्योता पाटील आणि बिपिन गेहलोत, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आणि कामगार नेते संजय बापेरकर तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (दादरा नगर हवेली) हरिश्चंद्र कुलात यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला.

हिंदूहृदयसम्राट देशात नव्हे तर जगात एकच

हिंदूहृदयसम्राट देशात नव्हे तर जगात देखील एकच आहेत. हिंदूहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे एकच आहेत. मात्र ही उपाधी देखील काहीजण चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणातील या गद्दारांना गाडायला वेळ लागणार नाही. खरे शिवसैनिक या गद्दारांना गाडण्यासाठी परत येत आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमधील हवामहल विधानसभा क्षेत्रातील भाजप उमेदवार बालमुकुन्द आचार्य यांच्या प्रचारासाठी गेले होते. तेथे दौऱ्याच्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा करण्यात आला होता.  (Latest Marathi News)

पालघरमध्ये लवकरच सभा घेणार

उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, पालघरकडे माझं दुर्लक्ष झालं. एक निवडणूक आपण जिंकलो आता पुन्हा जिंकू. पालघरमध्ये मी भेटी-गाठीसाठी दौरा करणार आहे. जनतेला काय पाहिजे हे सरकारला कळत नसेल तर जनतेचा आवाज शिवसेना बनेल. मी कोणा व्यक्तीविरोधात नाही वृत्तीविरोधात आहे. लवकरच पालघरमध्ये सभा घेईन, असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT