Uddhav Thackeray, Pune, Maharashtra Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Aurangabad Tour: उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हाती आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मराठवाड्याला परतीच्या पावसाने (Rain) झोडपून काढलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी ते करणार आहेत. परतीच्या पावसामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावलं आहे. मराठवाड्यातील शेतीचं मोठं नुकसान झाले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हाती आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यानंतर काय बोलतात याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. (Maharashtra News)

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. पावसाने अक्षरशः कहर केला असून, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके संपूर्णतः वाया गेली आहेत. काही ठिकाणी घरांचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे एकीकडे दिवाळीची धामधूम सुरु असताना शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारमय झाली आहे.

शेतकऱ्यांना या कठीण समयी तातडीने मदतीची सरकारकडून अपेक्षा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रम सुरू होणार, महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार

Jamner News : सासू, सासरे व पत्नीचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी छापेमारी, बॉम्बब्लास्टची होती प्लानिंग?

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT